corona-children.jpg 
मुंबई

धक्कादायक! मार्च महिन्यात महाराष्ट्रात ५५ हजाराहून अधिक लहान मुलांना कोरोना

दीनानाथ परब

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात लहान मुलांना आणि किशोरवयीन मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मार्च महिन्यात महाराष्ट्रात सहालाखापेक्षा जास्त नागरिकांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. डाटानुसार, मार्च महिन्यात १० वर्ष वयापर्यंतच्या १५,५०० मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. ११ ते २० हा किशोरवयीन वयोगट एकत्र जोडला, तर मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण ५५ हजारपेक्षा जास्त आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी हे प्रमाण १० टक्के आहे. 

वैद्यकीय शिक्षण खात्याच्या डाटा विश्लेषणानुसार, मार्च महिन्यात कोरोनाचा स्फोट झालाय. ३१ ते ४० वयोगटात २२ टक्के म्हणजे १.३४ लाख कोरोनाबाधित आहेत. ४१ ते ५० वयोगटात १८ टक्के आणि २१ ते ३० वयोगटात १७ टक्के नागरीकांना कोरोनाची बाधा झालीय. जानेवारीत १० वर्षापर्यंतच्या दोन हजार, फेब्रुवारीत २,७०० मुलांना कोरोनाची बाधा झाली होती. मार्चमध्ये हेच प्रमाण १५,५०० आहे. ११ ते २० वयोगटात जानेवारीत ५,३०० आणि फेब्रवारीत ८ हजार मुले कोरोनाने ग्रस्त होती. 

मार्चमध्ये हेच प्रमाण ४० हजारच्या घरात आहे. इमारतीच्या सोसायटया आणि गार्डनमध्ये लहान मुलं एकत्र असतात. मास्कशिवाय खेळतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय. एक चांगली बाब म्हणजे लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षण सौम्य असून ती वेगाने बरी होतायत, असे बालरोग तज्ज्ञांनी सांगितले. 

तात्याराव लहाने काय म्हणाले?
राज्यात लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण होतेय, त्या बद्दल प्रसिद्ध डॉक्टर तात्याराव लहान यांना विचारले असता, ते म्हणाले की, "लहान मुलांची रोगप्रतिकारक सक्षम आहे त्यांना कोरोना झाला तर सौम्य स्वरुपाचा असतो. पण हा आजारच होऊ नये, यासाठी सोबत लहान मुले असताना विशेष काळजी घेतली पाहिजे."  
"साथरोगामध्ये विषाणूचे स्वरुप बदलत असते. गेल्यावर्षी कोरोनाच्या विषाणूमुळे एकापासून तीन ते चार जण बाधित होत होते. पण आता एकापासून १० जणांना कोरोनाचा संसर्ग होतोय. २० ते ४० वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे."
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT